nagpur violence Saam Tv
Video

Nagpur Clash: नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आणि दंगेखोरांची मालमत्ता जप्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, VIDEO

Maharashtra CM Devendra Fadnavis: औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचाराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोड आलेले आहेत.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये जाऊन आज सकाळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर त्यांनी सर्व दंगलग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, हि सर्व दंगल सोशल मीडिया मार्फत काही अफवांमुळे पसरली आहे. त्यामुळे ज्यांनी या अफवा पसरवल्या त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे. जवळपास 68 पोस्ट ह्या ज्या लोकांनी वायरल केल्या त्यांची ओळख पटलेली असून त्यांनी त्या पोस्ट डिलीट देखील केलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहेत.

तसेच अजून काही पोस्टबाबत माहिती घेणे चालले आहेत. काही लोकांनी भडकाऊ पॉडकास्ट देखील केली. चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये एक पॅनिक तयार केले. अशा सर्व लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. हिंसाचारामुळे ज्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामध्ये गाड्या फोडल्या गेल्या, घरे जाळण्यात आली, त्या सर्वांचे नुकसान भरपाई तीन ते चार दिवसांत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः लक्ष ठेवून आहेत. जे काही नुकसान झाले आहे ते दंगे खोरांकडून वसूल केले जाईल,आणि दंगेखोरांनी ते भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकली जाईल असा सणसणीत इशारा देवेंद्र फडणीस यांनी दंगेखोरांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

Green Tea: रोगप्रतिकारकशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे ग्रीन टी

SCROLL FOR NEXT