Chief Minister Devendra Fadnavis announces ₹22 crore flood relief package for farmers, homes, and shops in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Flood Relief Package: घरं, झोपड्या, दुकानदारांना भरपाई मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण कशी? VIDEO

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी, घरं, दुकानदारांसाठी मोठा मदत पॅकेज जाहीर करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर सरकारने आज ही मदत जाहीर केली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती, पिके, घरांचे नुकसान झाले. काही लोकांचा मृत्यू झाला. आपल्याला भीषण चित्र पाहायला मिळाले. आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला. तातडीची मदत म्हणून घरामध्ये पाणी शिरले म्हणून १० हजार देण्याचा विषय, गहू-तांदूळ देण्याचा विषय असेल. तातडीने २२ कोटी मंजूर करून पहिला हप्ता दिला.

जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचा प्रयत्न करत होते. पिक करपून गेले, पाणी साचले, शेतात चिखल, काही ठिकाणच जमीन खरडून गेली. त्यामुळे रब्बीची पेरणी करायची स्थिती राहिली नाही. आपला शेतकरी पुन्हा पायावर उभा राहिला पाहिजे. शेती भविष्यात पुन्हा उभी राहिली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खास पॅकेज तयार केले आहे.

राज्यात एक कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर पिकाची लागवड झाली होती. त्यापैकी ६९ लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले. २९ जिल्ह्यात जास्त नुकसान झालेय. २५३ तालुके मदतीसाठी सरसकट घेतले आहे. आपण सर्व प्रकारची मदत करतोय.. नव्या घरे बांधण्यासाठी मदत करणार आहोत. त्याला पूर्ण पैसे देऊन घराची निर्मिती करणार आहोत. डोंगरी भागातील घराला १० हजार जास्तची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक जनावरसाठीही मदत केली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

SCROLL FOR NEXT