Supporters of Padalkar and Awhad taken into custody after the Maharashtra Assembly scuffle. Saam Tv
Video

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

Padalkar And Awhad Supporters Were Jailed After Assembly Clash: मुंबईतल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या राड्यानंतर पडळकर आणि आव्हाड समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आज पडळकर कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाड समर्थक नितीन देशमुख या दोघांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेत झालेली धक्काबुक्की प्रकरणी विधानसभेत विशेष अधिकार समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला आहे.

विधानसभा विशेषाधिकार समितीने जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांना २ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १७ जुलै २०२५ रोजी विधानभवनात झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, त्यांना २०२९ पर्यंत विधानभवनात प्रवेशबंदी घालण्याची शिफारस समितीने केली आहे. अभ्यागतांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली आणि पोलीस पडताळणीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही अहवालात देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भावी शिक्षकांना मोठा दणका; TAIT परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Silver Mangalsutra Design: तुमच्या लाडक्या बायकोला द्या हे फॅन्सी मंगळसूत्र, बघताच क्षणी प्रेमाने करेल कौतुक

बापरे! बदलापूरच्या आंबेशिवमध्ये दोन-दोन बिबटे; भरदुपारी कुत्र्याची शिकार केल्याचा दावा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ १५००;कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT