मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोणावळा रेल्वे यार्डच्या पुनर्रचना आणि सिग्नलसंबंधी कामांसाठी मध्य रेल्वेने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. सकाळी 11.25 ते सायंकाळी 6.25 यावेळेत ब्लाॅक घेतला जाणारय. ब्लॉक वेळेत कर्जत, लोणावळा, भिवपुरी रोड स्थानकांवर विविध मेल-एक्स्प्रेस थांबवण्यात येणार आहेत. यामुळे डेक्कन एक्स्प्रेससह एकूण 15 मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणारआहे.
लोणावळा–बीव्हीटी यार्ड आणि कल्याण–लोणावळा विभागात २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान प्री नॉन-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
यामुळे इंद्रायणी व इंटरसिटी एक्स्प्रेसला २८-२९ नोव्हेंबरला १०–२५ मिनिटे उशीर होणार आहे. २६ व २७ नोव्हेंबरला डाउन लाईनवर ११.१५ ते ६.२५ पर्यंत ब्लॉक राहील. काही गाड्यांना अतिरिक्त थांबे, तर काहींना विलंब होणार आहे, जसे की जोधपूर–हडपसर एक्स्प्रेस कर्जत येथे ४५ मिनिटे, तर चेन्नई, मदुराई, कोणार्क, हैदराबाद, काकिनाडा एक्स्प्रेस या गाड्यांना १० मिनिटे ते १ तासपर्यंत उशीर/थांबे. २८–२९ नोव्हेंबरला अप व डाउन दोन्ही मार्गांवर ब्लॉक असून डेक्कन, उद्यान, कोयना, इंदूर, नागरकोइल, चेन्नई एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे नियमन होणार आहे .या काळात पुणे–लोणावळा उपनगरी गाड्या तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.