सांगलीमधील आष्टामध्ये शरद पवर गटाचे कार्यकर्त्यांनी स्ट्रॅाग रुमसमोर ठिय्या मांडलाय. मतदानातील टक्का वाढवल्याचा आरोप करत शरद पवार गट राष्ट्रवादी आणि मविआच्या कार्यकर्त्यांनी आष्टामधील स्ट्राँगरुम समोर ठिय्या आंदोलन केलं. आष्टा नगरपरिषदेत दोन्ही राष्ट्रवादीत लढत आहे. दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीत आणि आयोगाच्या पोर्टलवरील आकडेवारीत तफावत आढळून आल्यानं सकाळपासूनच कार्यकार्त्यांनी स्ट्रॅागरुम बाहेर आंदोलन सुरू केलंय. स्ट्राँगरुमजवळ एकही सुरक्षा रक्षक नसल्याची बाब लक्षात येताच कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. पोलीस आणि तहसीलदारांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येत आहे. दरम्यान मतदानाचा आकडा दोन हजारांनी वाढलाय.
आष्टा नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकड्यानुसार ३३,३२८ मतदार होते. तर वार्ड क्रमांक ३ मध्ये एकूण मतदार हे १३११ मतदार आहेत. पण प्रशासनाने एकूण मतदार ४०७७ असल्याचं म्हटलंय. यात मतदान ३१०९ मतदान झाल्याचं सांगितलं. तर ९ नंबरच्या वार्डात ७०९ मतदान झाल्याच म्हटलंय. पण वास्तविक ७०८ मतदान झालंय. तर १० नंबरच्या वार्डात ४३२९ मतदान झाल्याच सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.