Sambhajinagar Leopard News  Saam TV
Video

Sambhajinagar Leopard News : छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याची दहशत

संभाजीनगर शहरात मॉलजवळ एक बिबट्या फिरताना दिसला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Tushar Ovhal

गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरात एका बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांना घरा बाहेर पडणंही मुश्किल झालंय.. या बिबट्याची दहशत इतकी की, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनीही धसका घेतलाय. बिबट्याला शहरातल्या वेगवेगळ्या भागात पाहीलं गेलंय.. हा बिबट्या बुधवारी रात्री शहरातील एका मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला. हा मॉल सिडको परिसरात आहे. या बिबटयाचा एवढा धसका घेतलाय की उल्का नगरातली शाळाही बंद ठेवण्यात आलीय. शहराचा मध्य भागी असलेल्या उल्कानगरी भागात हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय..बिबट्यासाठी या भागातही ट्रॅप लावण्यात आलेत.. सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं असून त्यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली आहे. वन विभागाचे एकूण 100 कर्मचारी या मोहिमेत आहेत. एक पथक नाशिकवरून आले आहे. शिवाय गनमॅनचाही त्यात समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्या वन विभागाच्या हाती लागलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Sonar Post: 'आमचा लाडोबा आज...' शिवानीनं आईला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Maharashtra News Live Updates: मविआनंतर आता लवकरच जाहीर होणार महायुतीचा जाहिरनामा

Vastu Tips: घरात देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्या?

Shahapur Vidhan Sabha : नेतेच गेल्याने घ्यावी लागली माघार; श्रेयवादाच्या लढाईत उच्च शिक्षित तरुणाची माघार

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा! पाहा Video

SCROLL FOR NEXT