leopard Attack incident in maharashtra MLA Sharad Sonawane saam tv
Video

अधिवेशनात बिबट्याच्या वेशात आला आमदार! पाहा व्हिडिओ

Leopard Attack in Maharashtra : राज्यातील अनेक भागांत बिबट्यांनी माणसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. हाच प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी आमदार चक्क बिबट्याच्या वेशात आले.

Nandkumar Joshi

leopard attack human : राज्यात सर्वत्र बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मानवी वस्तीत घुसून शेतकरी, महिला-मुलांवर बिबटे हल्ले करत आहेत. अनेक ठिकाणी तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाच प्रश्न घेऊन आमदार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पोहोचले आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी चक्क बिबट्याच्या वेशात अधिवेशनात एन्ट्री केली.

जुन्नर, अहिल्यानगरमध्ये रेस्क्यू सेंटर तयार करावेत. बिबट्याच्या संदर्भात राज्य आपत्ती घोषित करावी, अशी मागणीही आमदार सोनवणे यांनी केली. यावेळी त्यांनी सरकारला हात जोडून विनंती केली. तीन महिन्यांच्या आत दोन हजार बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर तयार करावेत. एक हजार मादी आणि एक हजार नर बिबटे राहतील अशी व्यवस्था करावी. जेणेकरून नसबंदीचा विषय मार्गी लागेल. जुन्नर आणि अहिल्यानगर असे दोन रेस्क्यू सेंटर तयार करावेत. बिबट्यांना ट्रॅप करण्यासाठी मायक्रो ऑपरेशन करावे लागेल, असेही आमदार सोनवणे यांनी सूचवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT