Drunk Youths Beaten To Youth Saam TV
Video

Latur Crime: मद्यधुंद तरुणांचा तुफान राडा; बाचाबाचीनंतर हाणामारी, तरुणाच्या डोक्यावर फोडल्या बाटल्या

Drunk Youths Beaten To Youth : दारूच्या कारणावरून तरुणांनी बारमध्येदेखील तरुणाला मारहाण केलीय. सगळे तरुण एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

लातूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा तुफान राडा पाहायला मिळाला. एका तरुणाला रोडवर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तरुण फरार झाले होते. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी मारहाण केलेल्या ठिकाणाहून पोलीस ठाण्यापर्यंत हाणामारी करणाऱ्यांची धिंडदेखील काढली. दरम्यान आता या मारहाणीचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय. यात विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला बारमध्ये सुद्धा मारहाण झाली होती, असं दिसत आहे.

याबाबतचा व्हिडिओ सोशल माीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बारमधील आहे. ज्या रस्त्यावर मारहाण झाली होती, त्याच मुलाला परत बारमध्ये मारहाण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या तरुणांमध्ये दारूवरून हॉटेलमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. हॉटेलमध्ये देखील या तरुणांमध्ये तुफान राडा झाला. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर त्याचे मित्र तेथून पळून गेले. मात्र काही वेळातच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत कारवाई केली.

मारहाण करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंडदेखील काढली आहे. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर एक जण अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची पुढील माहिती अशी की, वाद झालेले तरुण एकमेकांचे मित्र असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT