Nashik news  saam tv
Video

Nashik Rain: डोळ्यांदेखत होत्याचं नव्हतं झालं! पावसाच्या तडाख्याने कांद्याचं शेड कोसळलं, नाशकात बळीराजाचं लाखोंचं नुकसान|VIDEO

Unseasonal Rains Damage Stored Onions in Lasalgaon: मे महिन्याच्या कडक्याच्या उन्हात देखील अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा अक्षरश: सडून गेला आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तराधार्थ सुरू झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजापुढे मोठे संकट उभे केले आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतातच साठवून ठेवलेला कांदा ओल्या हवामानामुळे सडला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरात काल (सोमवार) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने मोठा कहर माजवला. या हवामानाने अक्षरशः चक्रीवादळाची अनुभूती दिली.

या मुसळधार पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांद्याचे शेड कोसळल्यामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला असून व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

याशिवाय, शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मुख्य बाजारपेठांतील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचे माल भिजून नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT