Lalbaghcha Raja x
Video

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

Lalbaghcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. भरतीमुळे विसर्जन लांबणीवर पडले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये लाडक्या राजाला निरोप देण्यात आला आहे.

Yash Shirke

Lalbaghcha Raja Visarjan : लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीमध्ये मार्गस्थ झाला आहे. मागील अनेक तासांपासून भरतीमुळे राजाचे विसर्जन रखडले होते. काल (६ सप्टेंबर) लालबागहून गिरगावच्या दिशेने निघालेला लालबागचा राजा आज (७ सप्टेंबर) चौपाटीवर पोहोचला. भरतीमुळे विसर्जन काही पुढे नेण्याचा निर्णय मंडळाने घेतला. कोळी बांधवांच्या मदतीने विसर्जनाची वेळ ठरवण्यात आली. साडेदहा-अकराच्या सुमारास विसर्जन करणे योग्य असल्याचे कोळी बांधवांनी मंडळाला कळवले. त्यानुसार, मंडळाने विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विसर्जनासाठी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली. आरती झाल्यानंतर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला सर्वांनी निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

SCROLL FOR NEXT