Ladki Bahin Yojana saam tv
Video

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Ladki Bahin Yojana September installment Date : दिवाळी तोंडावर आली तरी अद्याप लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे महिला वर्गात तीव्र नाराजी आहे.

Nandkumar Joshi

सागर निकवाडे, नंदूरबार | साम टीव्ही

महिन्याला १५०० रुपये बँक खात्यात जमा होत असल्यानं खूश असलेल्या लाडक्या बहिणी आता सरकारवर रुसल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप बँक खात्यात जमा झालेला नाही. आता ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडाही उलटून गेला आहे. मात्र, सरकारनं अद्याप बँक खात्यांमध्ये १५०० रुपये जमा केलेले नाहीत. त्यामुळे महिला वर्गात तीव्र नाराजी आहे.

दिवाळी तोंडावर आली आहे. अवघे काही दिवसच उरले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यात जमा करून सरकार महिलांची दिवाळी गोड करणार अशी अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिना संपला आता ऑक्टोबर सुरू झाला आहे. पण सप्टेंबरचाच हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे नाराजी असून, सरकारने लवकरात लवकर खात्यात पैसे जमा करून दिवाळी गोड करावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. दिवाळी जवळ आली आहे. तरी अद्याप पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. लवकरच दोन महिन्यांचे पैसे जमा करावेत, अशी मागणी लाभार्थी महिला सेवीबाई पावरा यांनी केली. सध्या ई केवायसी करायला लावली आहे. ती होत नाही. ओटीपी क्रमांक येत नसल्याने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही. दिवाळी तोंडावर आहे, तर त्याआधी दोन महिन्यांचे पैसे बँक खात्यात जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

Winter Yoga Time: हिवाळ्यात योगा करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

या दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला|VIDEO

Guhagar Beach : 'गुहागर' बीचला गेल्यावर काय काय पाहावे? येथे आहे निसर्ग सौंदर्याचा खजिना

SCROLL FOR NEXT