Ladki Bahin Yojana News SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीची टांगती तलवार; ४ हजार बहिणींनी घेतली माघार | VIDEO

Ladki Bahin Yojana Verification : राज्य सरकारने पडताळणी करण्याआधीच लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांनी माघार घेतली असल्याचं बघायला मिळत आहे. योजना नको असल्याचा अर्ज देखील या महिलांनी दाखल केला आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजनेतून राज्यातील ४ हजारांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी थेट माघार घेतली आहे. राज्य सरकारने पडताळणी करण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज करण्यास आता सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची सरकारकडून पडताळणी केली जात आहे. या पडताळणीमध्ये ३ ते ४ लाख बहीणी अपात्र ठरल्याचा अंदाज आहे. अपात्र ठरल्यास योजनेचे पैसे परत करावे लागणार असल्याची भिती या बहिणींना असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र त्या आधीच आता महिलांनी या योजनेतून माघार घेतल्याचं दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसाठी काही निकष लावण्यात आलेले आहे. यात पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक वगळता इतरांची देखील पडताळणी होत आहे. पडताळणीनंतर ३ ते ४ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरणार असल्याचा अंदाज आहे. संजय गांधी निराधार महिला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळलं जाणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्याना दरमहा १ हजार रुपये मिळतात, या महिलांना आणखी ५०० रुपये दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT