ladki bahin yojana SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा आर्थिक बोजा सरकारवर; एसबीआयने थेट इशाराच दिला | VIDEO

SBI Warning To State Government : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा आर्थिक बोजा राज्य सरकारवर येत असल्याने त्याचा परिणाम आगामी अर्थसंकल्पावर होईल असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने सरकारला दिला आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्याने त्याचा आर्थिक ताण राज्य सरकारवर आला आहे. त्याचा परिणाम आगामी अर्थसंकल्पात दिसू शकतो, असा इशारा एसबीआयने राज्य सरकारला दिला आहे. तसंच अशा योजना जाहीर करण्याबाबत देखील स्टेट बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे.

लाडकी बहिण योजनेसारख्या योजनांचा राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम होतो असं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे. लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण येतो आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला २८ हजार ६०८ कोटी रुपये खर्च होतात. या गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या ११ टक्के इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला १४ हजार ४०० कोटी रुपये खर्च होतो. या लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या ६ टक्के इतका आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर देखील लाडकी बहिण योजनेचा आर्थिक ताण आला असल्याने आगामी अर्थसंकल्पात परिणाम बघायला मिळणार असल्याचा थेट इशाराच एसबीआयने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT