विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ते जालन्यातील कार्यक्रमात बोलत होते. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. राज्यातील १ कोटी बहिणींना आता लखपती दीदी करायचे आहे, असं संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडला.
काहीही झालं तरी आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. पाचही वर्षे आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देत राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्णय झाला आहे. माझ्या ५० लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. १ कोटी बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.
मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केला. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करत आहोत. एकीकडे कोल्हापूर, सांगलीचे पुराचे पाणी, ३५ टीएमसी पाणी उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतोय. तर दुसरीकडे पश्चिमी वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आम्ही आणतोय, अशी माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.