New car driving tips: नवीन कारचा स्पीड किती ठेवावा? इंजिन खराब होऊ नये म्हणून ‘हे’ नक्की करा

Surabhi Jayashree Jagdish

सुरुवातीचे १,००० ते १,५०० किमी महत्त्वाचे

नवीन कारच्या सुरुवातीच्या काळाला अनेकदा ‘ब्रेक-इन’ किंवा ‘रनिंग-इन’ पीरियड म्हटलं जातं. या काळात इंजिन आणि इतर यांत्रिक भाग नव्याने एकत्र काम करत असतात. त्यामुळे पहिल्या सुमारे १,००० किमीमध्ये कार जपून चालवणं गरजेचं असतं.

new car running-in period | saam tv

सुरुवातीला वेग नियंत्रित ठेवा

नवीन कार सुरुवातीच्या काळात चालवताना शक्यतो मध्यम वेग ठेवावा. ७० ते ८० किमी/तासच्या आसपास वेग ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण ही सर्व कारसाठी ही मर्यादा ठरलेली नाही.

new car engine care | saam tv

इंजिनच्या RPM कडे लक्ष द्या

कार चालवताना फक्त स्पीडोमीटरकडे न पाहता इंजिनचं RPM देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पेट्रोल कारमध्ये २,५०० RPMच्या खाली आणि डिझेल कारमध्ये २,००० RPMच्या आसपास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

new car tyre break-in | saam tv

अचानक रेस देऊ नका

नवीन कार मिळाल्यानंतर अॅक्सिलरेटर जोरात दाबून अचानक वेग वाढवणं टाळा. सुरुवातीच्या काळात हळूहळू आणि सहजपणे वेग वाढवणं योग्य पद्धत आहे. कारच्या अधिकृत मार्गदर्शिकांमध्येही सुरुवातीच्या काळात अचानक वेग वाढवणं आणि पूर्ण अॅक्सिलरेटर देणं टाळावं.

new car braking tips | saam tv

टायर आणि ब्रेकचा वापर

नवीन कारचे टायर आणि ब्रेक वापरात आल्यानंतर रस्त्याशी आणि ब्रेकिंगच्या परिस्थितीशी व्यवस्थित जुळतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अचानक ब्रेक लावणं टाळलं पाहिजे.

petrol car RPM | saam tv

महामार्गावर एकाच वेगाने सतत गाडी चालवू नका

नवीन कार घेऊन हायवेवर जाताना क्रूझ कंट्रोल लावून बराच वेळ एकाच वेगाने गाडी चालवणं टाळलं पाहिजे. सुरुवातीच्या काळात गाडीचा वेग आणि इंजिन RPM वेळोवेळी बदलणं उपयुक्त ठरतं.

new car engine break-in | saam tv

पहिली सर्व्हिस वेळेवर करा

नवीन कारची पहिली सर्व्हिस केव्हा करायची हे प्रत्येक कंपनी आणि मॉडेलनुसार वेगळं असू शकतं. त्यामुळे फक्त १,००० किमी पूर्ण झाले म्हणून सर्व कारची पहिली सर्व्हिस त्याच वेळी करणं योग्य नाही. कारच्या सर्व्हिस बुकमध्ये दिलेले किलोमीटर आणि वेळेचे अंतर पाळा.

new car speed limit | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

saam tv
येथे क्लिक करा