Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे लाभ बंद; महिलांनी थेट प्रशासनाच्या दारी; जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जाब; VIDEO

Majhi Ladki Bahin Yojana Hingoli: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या योजनेत महिलांचे अर्ज बाद केल्याने महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा अचानक लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोलीत अनेक गावातील शेकडो महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाब विचारण्यासाठी पोहोचल्या होत्या. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील तपवन व आजारसोंडा गावातील महिलांची संख्या जास्त होती. दरम्यान, सरकारने निवडणुकीआधी एखाद्या कोंबडीला दाणे टाकावे असा लाडक्या बहिणीला लाभ दिला. मात्र, हीच लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? असा सवाल देखील या महिलांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे. आमच्या घरी गाडी नाही मोठे वाहन नाही आम्ही सरकारच्या सर्व निकषांमध्ये बसतो तरी देखील आमचा लाभ बंद केला असल्याचं सांगत या लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे इकेवायसीचे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन आलेल्या लाडक्या बहिणी तब्बल तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात थांबल्या होत्या शासनाचे प्रतिनिधी योग्य उत्तर देत नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Scam: लाडकींनो सावध व्हा, मोठा स्कॅम आला समोर, e-KYC करताना फसवणूक, खातं रिकामं होईल

Maharashtra Live News Update: 27, 28 आणि 29 सप्टेंबर मराठवाड्यासाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून "अलर्ट" जारी

Avika Gor Wedding : तारीख ठरली! नॅशनल TVवर 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीच्या लग्नाचा बार उडणार

Heavy Rain : भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात मुसळधार; घरांसह दुकाने, गुदामात शिरले पाणी

Solapur Rain : चांदणी नदीला महापूर, ५ गावांचा संपर्क तुटला, बार्शी तालुक्यात भयानक पूरस्थिती | VIDEO

SCROLL FOR NEXT