Pune SAAM TV
Video

Pune : घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर पोलिसांचा छापा | VIDEO

Nilesh Ghaywal : घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ यांच्या घरावर कोथरुड पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.छाप्यावेळी कोथरूड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ यांच्या घरावर कोथरुड पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घायवळ यांची एक एसयूव्ही कार आणि दोन दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली आहेत. छाप्यावेळी कोथरूड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी निलेश घायवळ याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तो सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरात घायवळ टोळी आणि गुन्हेगारी पोलिसांची धडक मोहीम चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Maharashtra News Live Update: शेत जमिनीच्या वादातून दोन गटात वाद आणि शिवीगाळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT