Railway Service Issue Saam tv
Video

Railway Service Issue : मुसळधार पावसाचा फटका; कोकण रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल, VIDEO

Railway Service update : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. मात्र, दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

Vishal Gangurde

रत्नागिरी - रत्नागिरीत कोसळणाऱ्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. विलवडे स्टेशनदरम्यान मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. दरड कोसळल्यामुळे जनशताब्दी , तेजस एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत आहेत. या घटनेने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.

काही तासांनंतर कोकण रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश आलं. दोन तासानंतर दरड हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्वपदावर आली. जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर वेरवली - विलवडे स्टेशन दरम्यान संध्याकाळी दरड कोसळली होती. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. जवळपास दोन तासानंतर दरड हटविण्यात यश आल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र काही गाड्या उशिराने धावताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT