Nandurbar Saam TV
Video

Nandurbar : नंदुरबारमध्ये कोंडाईबारी घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्णतः ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा | VIDEO

Kondaibari Ghat landslide : नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात दरड कोसळली आहे.दरड कोसळल्याने मुख्य मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ही दरड दहिवेलहून विसरवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती रस्त्यावर आल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहेत. सध्या केवळ एका बाजूने वाहतूक सुरू असून, तीही अत्यंत संथगतीने सुरु आहे.

दरड हटवण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी सतर्क आहेत. दरड कोसळल्यानंतर घाटात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य दिसून येत आहे.प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना घाटात प्रवास करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT