kolhapur news saam tv
Video

Kolhapur Crime: पोलिसांनी कानशिलात लगावली अन् चोरट्याने खिसाच रिकामा केला,VIDEO

Kolhapur Theft: कोल्हापुरातील एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, ज्यामध्ये चोरट्याने आपल्या अंतरवस्त्रातून चोरी केलेला माल बाहेर काढला.

Omkar Sonawane

कोल्हापूर येथील गांधीनगरमध्ये चोरी करताना एका चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले. हा चोरटा गारगोटी येथील एका सौंदर्य शॉपीचा मालक अमित कवेकर असल्याचे समोर आले आहे.

तो रोज दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने येत असे आणि सामान निवडताना एका बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यात जाऊन त्या वस्तू आपल्या खिशात लपवत असे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने अनेक वस्तू आपल्या आंतरवस्त्रांमध्येही लपवून ठेवल्या होत्या. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

दुकानमालकांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याला एक चापट मारताच त्याने चोरीची कबुली दिली आणि एक एक वस्तू बाहेर काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून उपस्थित व्यापारी थक्क झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT