Kolhapur police seize over ₹6.5 lakh in counterfeit notes during raid at Gandhinagar. Saam Tv
Video

बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; साडेसहा लाखांच्या नोटा जप्त|VIDEO

Sangli-Gandhinagar Fake Currency Operation: कोल्हापूरमध्ये सांगली पोलिसांनी आणखी एकास अटक केली असून साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गांधीनगरमध्ये छापेमारीत अर्धवट बनवलेल्या नोटा आणि प्रिंटिंग साहित्य जप्त करण्यात आले.

Omkar Sonawane

बनावट नोटा प्रकरणी सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आणखी साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करत एकास अटक केली आहे. कोल्हापूरच्या गांधीनगर येथे छापा टाकत पाचशे रुपयांच्या 1 हजार 300 बनावट नोटा, त्याच बरोबर अर्धवट बनवलेल्या नोटा कागदांचा बंडल आणि प्रिंटीगचे वेस्टेज साहित्य जप्त करण्यात आले आहे. अभिजीत पोवार यास अटक करण्यात आली असून बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. मिरजच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून कोल्हापुर येथे छापा टाकून बनावट छपाईचे साहित्य जप्त करत पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबई कडे जाणाऱ्या 99 लाख 23 हजारांच्या बनावट नोटा जप्त बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता,आता या बनावट नोटांच्या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

Bads of Bollywood: समीर वानखेडे यांच्या याचिकेला नेटफ्लिक्सचा विरोध; 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' विरोधात केला होता उच्च न्यायालयात अर्ज

Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT