VIDEO: 'खोके मिळवले ते वाटणारच' असं म्हणत Kishori Pednekar यांचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला Saam TV
Video

VIDEO: 'खोके मिळवले ते वाटणारच' असं म्हणत Kishori Pednekar यांचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला

Kishori Pednekar on Graduate Election News: शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झालं आहे. या मतदान केंद्रावर भाजपचे मुंबई पदवीधर उमेदवार किरण शेलार आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर मतदान करणार आहेत. मुंबईत पार पडणाऱ्या निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी होतील. अनिल परब हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. ही सुशिक्षित नागरिकांची निवडणूक आहे मात्र काही ठिकाणी शिक्षकांना देखील पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ज्यांनी खोके मिळवले ते वाटणारच असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT