farmer news  saam tv
Video

Farmer News: दरवर्षीची व्यथा! शेतकऱ्याच्या पदरात बियाणं दरवाढीचं ओझं, खरिपाचा उत्पादन खर्च वाढला|VIDEO

Impact Of Seed Price Hike: सलग पाचव्या वर्षी खरीपासाठी सर्वाधिक बियाणे लागणाऱ्या मक्यासह विविध पिकांच्या बियाण्याची दरवाढ झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.

Omkar Sonawane

येवला: सलग पाचव्या वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर बियाण्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ४० टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या मक्याच्या बियाण्याच्या दरात यंदा १०० ते ३५० रुपयांची वाढ झाली आहे. साडेतीन ते चार किलोच्या थैलीसाठी आता शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

मका व्यतिरिक्त मूग, तूर, बाजरी यांसारख्या बियाण्यांच्या दरातही ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूणच करोडो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

बियाण्यांच्या या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढले असून शेतीसाठी लागणारे भांडवल आता तापदायक ठरत आहे. आधीच बदलते हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारपेठेतील अनिश्चितता या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बियाण्यांच्या दरवाढीने आणखी अडचणीत टाकले आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने बियाण्यांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवावे आणि अनुदानाच्या स्वरूपात तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील कृषी संघटनांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT