Brave fire brigade personnel seen rescuing a youth trapped at Pandavkada waterfall despite treacherous conditions. Saam Tv
Video

पांडवकडा धबधब्यावर तरुण अडकला, मदतीसाठी याचना, कसा वाचला जीव, पाहा व्हिडिओ

Fire Brigade Rescue Operation: खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने अतिशय धाडसी पद्धतीने वाचवले. प्रशासनाने धबधब्यावर बंदी घातलेली असूनही अनेक तरुण धोका पत्करून तिथे पोहोचत आहेत.

Omkar Sonawane

खारघर परिसरातील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या एका तरुणाचा अग्निशमन दलाने थरारक बचाव करत जीव वाचवला आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला असतानाही, अग्निशमन दलाने जीवाची पर्वा न करता धाडसाने हा रेस्क्यू पूर्ण केला.

दरम्यान, सदर धबधब्यावर प्रवेश करण्यास प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही अनेक तरुण नियम झुगारून झऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान, एक तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकला होता. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या खारघर अग्निशमन दलाने अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत बचावकार्य राबवले.

या धबधब्यावर जाण्यासाठी अनेकजण जंगलातील छोट्या पायवाटांचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटनांना तोंड द्यावे लागत आहे.

प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी यापूर्वीही वारंवार इशारे दिले असतानाही तरुणाईचे धाडस थांबत नाही. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी आता अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill : शहनाज गिल लग्न करणार नाही? 'Ikk kudi'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने केलं मोठे विधान

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Maharashtra Elections : एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ, म्हणूनच लांडगे,कोल्हे,मांजरी..; शिवसेना आमदाराचा विरोधकांवर हल्लाबोल

Jio Special Offer: वाह! २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत १० OTT प्लॅटफॉर्म्स मोफत

Local Body Election : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता, महायुतीच्या मंत्र्याने निवडणुकीचं वेळापत्रकच सांगितलं

SCROLL FOR NEXT