(पिंपरी चिंचवड) पुणे: खडकवासला ईव्हीएममधील पडताळणीत नवा वाद समोर आला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट स्लिपची मतमोजणी आता थांबवण्यात आली आहे. ईव्हीएममधील मूळ आकडेवारी आणि व्हीव्हीपॅटमधील स्लिपची पडताळणी का केली जात नाही. असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडकेंनी केलाय. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर, खडकवासला मतदारसंघातील दोन ईव्हीएमची पडताळणी होणार होती
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील फेर मोतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये व्हीव्हीपट माशीनमधील वोटर स्लिप गहाळ झाल्याचा आरोप करत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी ही प्रक्रिया थांबवली आहे. आजच्या प्रक्रियेत फक्त ईव्हिएम पडताळणी आणि मोकपोल याचीच तपासणी होणार होती. त्यानुसार तपासणी केली आहे. तसेच ईव्हीएम माशीनमधील डेटा डिलीट केल्याशिवाय मोकपोल घेता येणार नाही. असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे ही समाधानकारक नसून आजच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उमेदवार सचिन दोडके यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.