Karuna Munde addressing the media with a powerful claim about Maharashtra’s political future. Saam Tv
Video

Karuna Munde: ...तर महाराष्ट्र हादरेल करुणा मुंडेंचा मोठा दावा; पाहा VIDEO

Karuna Munde’s Bold Claim: करुणा मुंडे यांनी साम टीव्ही संवादात मोठा दावा केला आहे की महाराष्ट्र हादरेल.

Omkar Sonawane

आज करुणा मुंडे शर्मा यांनी साम टीव्ही संवाद साधत गौप्यस्पोट केले. करुणा मुंडे म्हणाल्या, 27 वर्ष धनंजय मुंडे ला मी आधार दिला. पंकजा पालवे ताई आणि धनंजय मुंडे यांचे 2022 पर्यंत भांडण होतं. त्यावेळेस मी आधार दिला. ज्यांनी खरंच आधार दिला त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता. ज्यांनी तुमच्यासोबत कटकारस्थान रचले त्यांना तुम्ही म्हणताय की आधार दिला. हे मोठे राजकारणी लोक कधीही दुसऱ्यांची किंमत करत नाही. हे दोघे भाऊ बहीण कटकारस्थान खालच्या पातळीवर रचायचे. बीड आणि परळीमध्ये यांना कोणी दुसरा नकोय केवळ स्वतःच शासन राहिला पाहिजे म्हणून ते एकत्र आले आहेत. आत्मियता, माणुसकी काही नको केवळ राजकारण त्यांना परळीत हवं. एकदा तुम्ही म्हणता गुंड आम्हाला नको. एकदा तुम्ही म्हणता वाल्मीक कराड शिवाय पोटाचं पाणी हलत नाही. कालच्या सभेत वाल्मीक कराडचे झेंडे आणि पोस्टर्स बघितले आहेत. अशा क्रूर माणसाचे झेंडे तुम्ही दाखवता आणि लोकांना ज्ञान देता की गुंड पाळू नका म्हणून माझ्याकडे मंत्रीपद नाही पण माझी बहीण मंत्री आहे असं धनंजय मुंडे म्हणतात पण काय ते पाठिंबा देणार?

अनेक साखर कारखाने बंद पाडले आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वाऱ्यावर आहेत. यांना केवळ ऊसतोड कामगारांची मते हवी आहेत. मोठ्या मुंडे साहेबांकडे बघून शेतकऱ्यांनी आपली जमीन मंगेश्वर साखर कारखाना आणि वैद्यनाथ कारखान्याला दिली. ती जमीन नमिता मुंदडाला विकली आणि तुम्ही लोकांचे पैसे पण देत नाही? शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पंकजा मुंडे म्हणाली, महिषासुरमर्दिनीला मी आवाहन करते की राक्षसांना संपवण्याची मला शक्ती दे. तुम्ही माझी नणंद आहात एक वहिनी म्हणून आणि महिला म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करते की, परळीची महिला खूप परेशान आहे. दारूबंदी करा ना. तो राक्षस संपवा. 2019 च्या सभेमध्ये तुम्ही धनंजय मुंडे ला राक्षस म्हटलं होतं. त्यामुळे घरापासून सुरुवात करा. धनंजय मुंडे सारख्या राक्षसाला संपवा पहिलं. ज्याने स्वतःच्या बायकोला मुलांना रोडवरती सोडलं. आणि बाजारू महिलांना घरात आणलं. त्याचे काय काय परिणाम घडले आहेत घरात? परळीच्या धनंजय मुंडेंच्या घरात काय काय परिणाम घडले आहेत मी अजून कोणालाच सांगितलं नाहीये. खरंच तुम्हाला महिषासुरमर्दिनीचे आशीर्वाद हवे आहेत तर खरोखर तुमच्यापासून सुरुवात करा. नातं वगैरे काही नाही हे फक्त राजकारण आहे. मी स्वतः पाहिला आहे हे लोक अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतात. ज्यांची स्वतःची बायको रोडवरती फिरत आहे. मुलं बायको घरामध्ये सडत आहे. डिप्रेशनमध्ये जात आहे. तुम्ही कसलं राजकारण करणार. तुम्ही कधीपर्यंत पैसे देऊन विधानसभेवर जाणार जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. जनता न्यायप्रिय आहे. पंकजाताई... पंकजा पालवे ताई... राजकारणासाठी हे मला करुणा मुंडे असून करुणा शर्मा म्हणतात. पंकजा पालवे आहे तरी त्यांना मुंडे म्हणतात.

परळीच्या जनतेने दोन वेळा त्यांना हरवले आहे.... पैसे देऊन देऊन कधीपर्यंत तुम्ही विधानसभेवर जाणार? सगळ्यांना माहिती आहे मला राजकारण माहित आहे.. हजार हजार कोटी मंत्री पदासाठी देतात.. मला माझ्या नवऱ्याने सगळं सांगितलं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT