Tourist vehicles lined up in a 5-6 km long queue on Karjat-Murbad highway amid monsoon weekend rush. saam tv
Video

कर्जत-मुरबाड महामार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा; पर्यटकांच्या वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांबच लांब रांगा|VIDEO

Karjat Road Jam Due To Tourist Influx: माथेरान आणि कर्जतच्या दिशेने पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने कर्जत-मुरबाड महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली आहे.

Omkar Sonawane

पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी माथेरान आणि कर्जतकडे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे कर्जत ते मुरबाड महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली असून, पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

विशेषतः माथेरानहून नेरळच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दुसरीकडे, अनेक पर्यटक मुंबईच्या दिशेने परतत असल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर ताण आला आहे. वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनाही या कोंडीत अडकल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र पर्यटकांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे. सुटीच्या दिवशी पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान, कर्जतकडे आकर्षित होत असल्याने अशी वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Care : पीरियड्समध्ये अति गोड खाणे पडू शकते महागात, फूड क्रेव्हिंग 'असं' करा कंट्रोल

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

SCROLL FOR NEXT