Kangana Ranaut in Legal Trouble Over Gutter Generation Remark saam tv
Video

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

Kangana Ranaut legal case over Gutter Generation remark : बॉलिवूड अभिनेत्री ते पॉलिटिक्स असा प्रवास करणाऱ्या भाजप खासदार कंगना रणौत कायदेशीर कचाट्यात सापडल्यात. जेन झींना गटर जनरेशन म्हणणं त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हे प्रकरण कोर्टात पोहोचलंय.

Nandkumar Joshi

नीट पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतरमंतरवर जेन झींसह विद्यार्थी-पालकांनी आंदोलन केलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. या आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झींबद्दल भाजप खासदार कंगना रणौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारणही तापलं होतं. तर झेन झी आणि या आंदोलनाला पाठिंबा असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंगना यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

झेन झींना गटर जनरेशन म्हटल्यानं कंगना रणौत या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आग्रा येथील विशेष न्यायालयात २१ ऑगस्टला या प्रकरणावर पहिली सुनावणी होणार आहे. कंगना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा अपमान केला असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

कंगना रणौत यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना या वक्तव्यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. जे लोक स्वतःला कॉक्रोच म्हणतात. तर कॉक्रोच गटारातून निघतात असं जर आम्ही म्हणालो तर त्यात गैर काय? जर लोक स्वतःला कॉक्रोच म्हणतात आणि आम्ही म्हणतोय की गटार हे त्यांचे घरच आहे तर, यात वाईट का वाटून घ्यावं? मी स्वतःला कॉक्रोच समजत नाही. जर कुणी कॉक्रोच असल्याचा दावा करत असेल तर, ते गटारातच राहत असावेत. मी सर्व तरुणांना असं म्हणालेच नाही, असं स्पष्टीकरण कंगना यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT