CCTV footage shows the youth tearing the lehenga in a fit of rage after the refund was refused inside a Kalyan showroom. Saam Tv
Video

Kalyan Crime: दुकानदार पैसे परत देत नव्हता, तरूण संतापला, दुकानातच धक्कादायक कृत्य|VIDEO

Refund Drama Turns Violent: कल्याणमधील एका नामांकित शोरूममध्ये पैसे परत न दिल्याने तरुणाने चक्क लेहंगा-घागरा फाडला. संतप्त युवकाने शोरूममध्ये चाकू काढून धमकी दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Omkar Sonawane

कल्याण: शहरातील एका नामांकित कपड्यांच्या शोरूममध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका युवतीने खरेदी केलेल्या लेहंगा-घागऱ्याची रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी तिचा मित्र थेट गुंडगिरीवर उतरल्याचा प्रकार समोर आला आहे.

सुमित सयानी नावाचा तरुण आपल्या महिला मित्रासोबत शोरूममध्ये गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या मैत्रिणीने शोरूममधून एक लेहंगा-घागरा खरेदी केला होता. मात्र खरेदी केलेला ड्रेस नको असल्याने त्यांनी दुकानदाराकडे पैसे परत मागितले. त्याऐवजी दुसरे कपडे घ्या, अशी सूचना शोरूम चालकाने केली. मात्र पैशांची परतफेड करण्यास दुकानदाराने नकार दिला. यामुळे संतापलेल्या सुमित सयानीने थेट चाकू काढला, आणि दुकानातच लेहंगा-घागरा फाडून टाकला. त्यानंतर दुकानदाराला धमकी दिली की, “तुला पण असाच फाडेन, पैसे परत दे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महात्मा फुले पोलीस ठाण्याने सुमित सयानीला अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Maratha Reservation GR: सरकारला हा अधिकार नाही, आम्ही कोर्टात जाणार; जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक

Biggest Landowner India : सरकारनंतर भारतात सर्वाधिक जमीन कुणाकडे? तब्बल १७ कोटी एकर जागा आहे नावावर

GK: पौर्णिमेला उलट्या दिशेने वाहणारी नदी कोणती आहे आणि कुठे आहे?

Bhiwandi Crime : धडापासून शिर वेगळे करत फेकले खाडीत; महिलेच्या हत्येचा उलगडा, धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT