Ajit Pawar Death Case Saam Tv
Video

Ajit Pawar Death Case: FIR दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही; बारामतीकरांची आक्रमक भूमिका

Justice for Ajit Pawar: अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी बारामतीकर आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आमदार रोहित पवार बारामती पोलिस ठाण्यात गेले आहेत.

Priya More

अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बारामतीकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार हे बारामती पोलिस ठाण्यात आले असून गेल्या एका तासांपासून ते पोलिस ठाण्यातच आहेत. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अशी आक्रमक भूमिका बारामतीकरांनी घेतली आहे. अजित पवारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी बारामतीकरांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. रिक्षाचालकांपासून ते वकिलांपर्यंत सर्व बारामतीकर हे पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित आहेत.

'सत्य सगळ्या जनतेसमोर आले पाहिजे. हा अपघात आहे की घातपात हे कळालेच पाहिजे. आम्ही बारामतीकर रोहित पवारांना साथ देणार आहे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही.', अशी भूमिका बारामतीकरांनी घेतली आहे. तसंच त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी बारामतीकरांनी 'एकच वादा अजितदादा', 'अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे', 'परत या परत या अजितदादा परत या', अशा घोषणा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT