Jagbudi Nadi Saam TV
Video

Ratnagiri : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी | VIDEO

Jagbudi River : रत्नागिरी जिल्ह्याला आज आँरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून, ती 5.50 मीटरवर पोहोचली आहे. ही पातळी इशारा पातळीपेक्षा अधिक असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे नदीला मोठा पूर आला आहे. खेड बाजारपेठेतील काही भागांमध्ये पाणी शिरले आहे.

हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली असून, नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य सुरु ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नदी जवळ जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे अहवान करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT