Devendra Fadnavis Saam Tv
Video

Devendra Fadnavis: 'भाजपला स्वबळावर सत्ता अशक्य', देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ; VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यानंतर आता विधानसभेला सावध झालेल्या फडणवीसांनी राज्यात स्वबळावर सत्ता आणू शकत नसल्याचं म्हटलंय.. उपमुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झालीय. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. तर प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू शकत नसल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खळबळ उडालीय..मात्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहूयात....

मुलाखतीत फडणवीस काय म्हणाले?

  • भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही

  • मात्र भाजप हा सर्वाधिक मतांच्या टक्क्यासह सर्वात मोठा पक्ष ठरेल

  • महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी मोठा स्कोप आहे

  • एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह महायुती नक्की सरकार स्थापन करेल.

भाजपने महायुतीत सर्वाधिक उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच व्यावहारिकतेचा विचार करून फडणवीसांनी भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकतो आणि महायुती सत्ता स्थापन करणार, असा विश्वास व्यक्त केलाय. मात्र मतदार फडणवीसांचा विश्वास सार्थ ठरवणार की विश्वासाला तडा देणार? हे 23 नोव्हेंबरच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijaykumar Deshmukh News : भाजप कार्यकर्ता म्हणून काम करायचंय, विजायकुमार देशमुखांची मोठी प्रतिक्रिया | Video

Maharashtra News Live Updates: राज ठाकरे पुढील २ ते ३ दिवसांत पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Travel In Winter: नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायची आहे का? भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

Lucky Zodiac Sign: आज 'या' 5 राशींना मिळेल 'गुडन्यूज'; करिअरसह नात्याची फुलेल गुफंण

SCROLL FOR NEXT