Team India celebrates after defeating New Zealand to win the T20 World Cup title for the third time. Saam tV
Video

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दणदणीत विजय; तिसऱ्यांदा चॅम्पियन, राज्यात जल्लोष|VIDEO

India Wins T20 World Cup Final Against New Zealand: टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.

Omkar Sonawane

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने टी-20 वर्ल्डकपवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वांगीण कामगिरी करत न्यूझीलंडवर मात केली. फलंदाजीत भारताकडून अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या तिघांच्या शानदार कामगिरीमुळे भारताला मोठा विजय मिळवता आला.

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळ दाखवत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही भारताने दबदबा कायम ठेवत न्यूझीलंडला नमवले आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. भारतीय संघाच्या या यशामुळे देशभरातून खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT