India-Pakistan War  saam tv
Video

Atul Bhagare: भारत-पाकिस्तान युद्ध ३६ तासांत पेटणार; ज्योतिषाचार्य अतुल भगरे नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Astrologer Atul Bhagare: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Omkar Sonawane

पहलगाम घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल भगरे यांनी आज केली आहे.

भारताची रास मकर असून सध्या शनी तिसऱ्या स्थानी आहे. भारताची साडेसाती २९ मार्चला संपली आहे, त्यामुळे देशाचे ग्रहमान अनुकूल आहे. जर युद्ध झाले, तर त्यामध्ये भारताची बाजू प्रबळ राहील, असेही त्यांनी सांगितले.

मे महिन्यात भारताचे तीन ग्रह बदलणार आहेत. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी होण्याची शक्यता आहे. युद्ध झाल्यास सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होईल. पाकिस्तानचा काही भूभाग भारताकडे येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तान सीमेवर युद्ध सुरू होण्याची शक्यता असून, दोन्ही देश समोरासमोर ठाकले, तर हे तिसऱ्या महायुद्ध होऊ शकते, असेही ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT