Indian Air Force  saam tv
Video

India Pakistan Tension: ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; हवाई दलाचे सूचक वक्तव्य|VIDEO

Operation Sindoor Still Active: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला असला तरी, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दलाने एक महत्वपूर्ण विधान केले आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत युद्धविरामाची घोषणा केली. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सखोल माहिती दिली आणि या युद्धाला विराम दिला. यानंतर पाकिस्तानने अवघ्या काही वेळातच या कराराचे उल्लंघन करत रात्री अचानक गोळीबार सुरू केला. यावर भारताने जशास तसे उत्तर दिले. यावर हवाई दलाने माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून येत्या काळात यासंबंधी अधिक माहिती दिली आहे.

हवाई दलाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर म्हटले की, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नेमून दिलेली सर्व कामे अचूकतेने आणि जबाबदारीने यशसवरीत्या पूर्ण केली आहेत. ही कारवाई देशाच्या हिताच्या अनुषंगाने विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. ही कारवाई अजूनही सुरू असल्याने त्याची संपूर्ण माहिती लवकरच दिली जाईल. हवाई दलाने लोकांना कुठल्याही प्रकारची अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ही आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT