vishal patil news  Saam Tv
Video

Maharashtra Politics: विशाल पाटील यांनी भाजपात प्रवेश करावा, भाजपच्या या नेत्यानी दिली ऑफर, VIDEO

Vishal Patil: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी कॉंग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना तिकीट नाकारले होते. त्यावेळेस त्यांनी पक्षाला सोडचिठी देत अपक्ष निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्यांनी निवडून देखील आले. अशातच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.

Omkar Sonawane

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करावा अशी खुली ऑफर दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात नेहमी वर्तमानात चालावे लागते. यावरच खासदार विशाल पाटील यांनी त्यांच्या सुरातसुर मिसळवत पुढे काय होईल माहीत नाही अशी प्रतिक्रिया दिली. पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, वर्तमानात त्यांच्या हाताशी 4 वर्षे 2 महीने आहेत. त्यामुळे या कालावधीचा आम्ही विचार करतो. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातील एक संख्या वाढेल आणि जिल्ह्यातल्या विकासकामांना त्यांना जे करायचे आहे ते ही सोपे जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा देत आहोत. त्याचा त्यांनी विचार करावा. यावरच विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया देत मी नंतर प्रेस घेणार आहे असे बोलून यावर उत्तर देणे टाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mawa Barfi Recipe : फक्त ४ पदार्थांपासून बनवा स्वादिष्ट मावा बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

Ram Sutar : शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या काळाच्या पडद्याआड, राम सुतार यांचं निधन

Accident : आईसमोरच मुलीचा मृत्यू! शिकवणीला जाताना विद्यार्थिनीला ट्रकची धडक; वर्ध्यात खळबळ

Famous Actor Father Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत केली भावुक पोस्ट

Walking: वजन कमी करण्यासाठी खूप चालताय का? पण या ७ चुका टाळा; अन्यथा...

SCROLL FOR NEXT