Pakistan Internet Service saam tv
Video

Operation Sindoor Impact: भारतीय एअर स्ट्राइकचा दणका, भारतीय एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इंटरनेट बंद

Pakistan Internet Service off: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हवाई कारवाई करून मोठे नुकसान केले आणि दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.

Dhanshri Shintre

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जोरदार बदला घेत भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर मध्यरात्री लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. या कारवाईत दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आल्या.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर मोठा हवाई हल्ला चढवला, ज्यामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. भारतीय सैन्यानेही पाकव्याप्त काश्मीरमधील धामोल, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने भारताने आपली शक्ती ठामपणे दाखवून दिली आहे.

भारतीय हवाई कारवाईनंतर पाकिस्तानात मोठी हालचाल झाली आहे. पंजाब प्रांतात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, लाहोर विमानतळावर आपत्कालीन स्थिती लागू करून ते ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. याशिवाय, सियालकोट विमानतळही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अचानक बदलांमुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT