Nana Patole Saam Tv
Video

Nana Patole: 'मीच होणार मुख्यमंत्री', नाना पटोलेंचा मुखयमंत्रिपदावर दावा; CM पदावरून मविआत बिनसणार?

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपाची चर्चा सुरूए. मात्र असं असलं तरी सध्या आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जातोय.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीसाठी कधीही अचारसंहिता लागू शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरूए. एकमेकांची उणीधुणी काढून डिवचलं जातंय. अंदाज घेतला जातोय. यातच मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना डिवचलंय. नानांनी देखील पटेल यांना यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

एकीकडे निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू, असे बोललं जात असलं तरी मविआ आणि महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून जुगलबंदी रंगतेय. मविआत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला वारंवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा म्हणत दबाव टाकलायं. यावर दोन्ही पक्षांनी मौन बाळगलं आहे.

पटोलेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मात्र भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर आघाडीत उद्धव ठाकरे यांची ही इच्छा लपून राहीलेली नाही. राष्ट्रवादीतही जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे घेतली जात आहेत. अशा वेळी नेते मात्र मुख्यमंत्री होणारच अशी विधानं करत आहेत. त्यामुळे आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

SCROLL FOR NEXT