Assembly Election News SaamTv
Video

VIDEO : कुठे ५ कोटी, तर कुठे १.५ कोटी; राज्यात विधानसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरश: पाऊस !

Maharashtra Assembly Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोलिसांनी कोट्यावधींची रोकड जप्त केली आहे.

Saam Tv

राज्यात विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई करून कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील या घटना आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा या पैशांच्या पावसासाठी गाजणार का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या आचारसंहितेच्या काळात राज्यात मोठ्याप्रमाणात कोट्यावधीची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून ही रोक्त सापडली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरश: पाऊस होताना दिसत आहे. यात खेड शिवापुरमधून ५ कोटी, हिंगोलीतून १ कोटी, एरंडोलमध्ये १.५ कोटी सापडले होते. तर अमळनेरमधून १६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत आणि हडपसरमधून २२ लाखांची रोकड जप्त केली आहे. त्यामुळे विधानसभा आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या पैशांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

Maharashtra News Live Updates: ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा: एफआरपीसह एक रकमी ३७०० रुपये पहिली उचल द्या

Sushant Shingh: सुशांत सिंग प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; सीबीआयला फटकारलं

Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यवधी; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

One Family One Job: एक कुटुंब एक नोकरी योजना, निरक्षरांना 25 हजार पगार; काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य? वाचा..

SCROLL FOR NEXT