HSC New Syllabus Saam Tv
Video

HSC New Syllabus: मोठी बातमी! २०२७ -२८ मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार

HSC Syllabus: बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल जाहीर करतान बोर्डाने २०२७ -२८ मध्ये बारावीचा नवीन अभ्यासक्रम येणार असल्याचे देखील जाहीर केले. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

Priya More

बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. २०२७ -२८ पासून बारावीचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. २०२८ पर्यंत सीबीएससी अभ्यासक्रम करण्याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम निश्चिती लवकरच केली जाणार आहे. त्यानंतर २०२७ -२८ पासून बारावीला नवीन अभ्यासक्रम मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून सीबीएससी अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबाबत माहिती दिली. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. फेब्रुवारी २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. तर यावर्षी ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. यंदा देखील कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तसंच या निकाल यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 3 हजारांच्या ऐवजी १५०० रुपये मिळाले, आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये अपक्ष उमेदवारावर हल्ला

Honeymoon Destination : 'सुहाना सफर और ये मौसम...', 'हे' आहे भारतातील सर्वात सुंदर हनिमून स्पॉट

Nitesh Rane: निलेश-नितेशमध्ये शीतयुद्ध? राणे कुटुंबात अंतर्गत वाद की 'ऑल इज वेल'?नितेश राणेंचा मोठा खुलासा

Vicky-Katrina Baby Boy: आमच्या बाळाचं नाव काय? विक्की-कटरीनाने शेअर केलं त्यांच्या मुलाचं क्यूट नाव

SCROLL FOR NEXT