Mahayuti Saam Tv News
Video

Mahapalika Election : भाजप ४४, शिंदेसेनेचे २२ उमेदवार बिनविरोध कसे? आयोगाचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

State Election Commission order : महापालिका निवडणुकांमध्ये ६९ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सतर्क झाला आहे. भाजप व शिंदेसेनेच्या विजयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Mahapalika Election 2026 latest news : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोग सतर्क झालंय. या प्रक्रियेत उमेदवारांवर दबाव होता का, याची शहानिशा करण्यासाठी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवलाय. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचललेय. ठाणे आणि पनवेलमधील बिनविरोध निवडीमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार ४४ विजयी उमेदवार भाजपचे आहेत. तर २२ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यावर आता आयोगाने सविस्तर अहवाल मागवलाय. महापालिकेत निवडून आलेल्या बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या, असे आदेश निवडणूक आयोगाने स्थानिक यंत्रणांना दिले आहेत. उमेदवारांनी माघार केव्हा घेतली, त्यांनी दबावाचा काही आरोप केला का? याची शहानिशा करून सविस्तर अहवाल द्यावा, असे म्हटलेय. काही ठिकाणी सत्ताधारी नेत्यांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

SCROLL FOR NEXT