"Samruddhi Expressway accident near Washim the Innova car carrying six Myanmar nationals was completely mangled after hitting the divider Saam Tv
Video

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

Two Myanmar Nationals Killed: वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, म्यानमार येथील दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून नागपूरकडे जात असताना इनोव्हा गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात घडला.

Omkar Sonawane

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात म्यानमार येथील 2 विदेशी नागरिकांचा अपघातात मृत्यू झालाय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल 232 वर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून हा भीषण अपघात झाला आहे, इनोव्हा गाडीतून सहा विदेशी नागरिक होते. यात दोन महिला,तीन पुरुष आणि एक दहा वर्षीय मुलांचा समावेश आहे. हे सहा विदेशी नागरिक मुंबईवरून नागपूरला जात होते. या भीषण अपघातात 2 विदेशी नागरिक जागीच ठार झाले तर इतर तीन जखमी झाले आहेत. ड्रायव्हरसह एक विदेशी नागरिक सुखरूप आहेत. अपघातात गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला होता..दोन्ही मृतदेह वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT