Hingoli farmers inspecting waterlogged turmeric in the market committee yard after heavy rainfall. Saam Tv
Video

Hingoli Rain: हिंगोलीत मुसळधार पावसामुळे हळद पिक पाण्याखाली; बळीराजा संकटात|VIDEO

Turmeric Crops Submerged in Water: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हळद पिकावर मुसळधार पावसाचा फटका बसला असून बाजार समितीच्या यार्डात भिजलेल्या हळदीसाठी व्यापाऱ्यांनी योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे. मार्केट कमिटीच्या यार्डामधील पत्रे फुटल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या हळदीमध्ये पाणी शिरले आहे, तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची भिजलेली हळद योग्य भावाने खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे, विशेष म्हणजे देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, याच हिंगोली जिल्ह्यात बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा माल असुरक्षित झाला आहे. याकडे राज्याच्या सरकारसह हिंगोली जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर सध्या हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये संचालक मंडळ बरखास्त झाल्याने जिल्हा उपनिबंधाची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT