Nadurbar Rain News Saam TV
Video

Nandurbar News : नंदुरबारमध्ये भयानक पाऊस, रस्त्यांवर कमरेइतकं पाणी; धडकी भरवणारा VIDEO

Satish Daud

नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नद्यानाल्यांना मोठा पूर आलाय. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी ताराबंळ उडाली आहे. अनेक भागातील रस्त्यांवर कमरेइतकं पाणी साचलं.

दुसरीकडे नळवा रस्ता परिसरात असलेला रेल्वे बोगदा पूर्णत: पाण्याखाली गेला. त्यामुळे या बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे नवापूर तालुक्यातील नेसू नदीला देखील महापूर आलाय. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुरात पाण्यात पाईपांचा मोठा गठ्ठा वाहून आलाय.

पाईपांचा हा गठ्ठा बाहेर काढून तो घेऊन जाण्यासाठी धावपळ पाहण्यास मिळाली. अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केली. सध्या ग्रामीण भागात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असून त्याचे साहित्य उघड्यावर पडले आहेत. हे साहित्य नदीच्या पुरात वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT