Buldhana lonar Saam tv
Video

Buldhana : लोणारमध्ये मुसळधार पावसाचा कहर, हिरवड गाव पाण्याखाली, संपर्क तुटला | VIDEO

Heavy Rains in Lonar : बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. तालुक्यातील हिरवड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून या गावाचा संपर्क तुटला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हाहाकार माजवला. पांग्रा डोळे, टीटवी, नांद्रा आणि परिसरातील गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिरवड गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे.

पांग्रा डोळे गावातही घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टीटवी, कुंडफळ, बोरखेडी आणि गुंधा हे लघु प्रकल्प १००% भरले असून, प्रकल्पाखालील गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT