Akkalkot Saam Tv
Video

Akkalkot: अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, ओढ्याला पूर | VIDEO

Heavy Rain : अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यासह ओढ्याला पूर आला आहे. परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला असून अनेक भागांत पाणी साचले आहे. बोरगाव बादोले ते शिरवळ गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने पुलावर पाणी चढले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अचानक रस्ता बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिरवळसह परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक यंत्रणा लक्ष देवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन..

Tamil Nadu Politics : तमिळनाडूमध्ये पेच वाढला, TVK प्रमुख विजय यांचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, पण बहुमत कसं मिळवणार?

Crime: बायकोसोबत कडाक्याचे भांडण, नवऱ्याने स्वत:चं गुप्तांग कापलं

तमिळनाडूमध्ये राजकीय घडमोडींना वेग; थलपती विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Signs Before Death: मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं हे ६ संकेत, जाणून घ्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचं सत्य

SCROLL FOR NEXT