Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

Shreya Maskar

कोल्हापूर

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराच्या वायव्येस २० किलोमीटर अंतरावर वसलेला महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ५०० हून अधिक दिवस या किल्ल्यावर राहिले.

Kolhapur | google

पन्हाळा किल्ला

आपल्या नागमोडी , सापासारख्या रचनेसाठी पन्हाळा किल्ला प्रसिद्ध आहे. तसेच येथेच 'पवनखिंडीच्या ऐतिहासिक लढाई' घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगडाकडे कूच केली.

Panhala Fort | google

पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

पन्हाळा किल्ल्याला मूळतः 'ब्रह्मगिरी' म्हणून ओळखले जात असे. तसेच पन्हाळा किल्ल्याची इतर नावे पर्णाल (किंवा पर्णालगड), पन्हाळगड, पन्नगालय, शहानबी दुर्ग (मुस्लीम राजवटीत) अशी आहेत.

What Was the Old Name of Panhala Fort? | google

'पन्हाळा' नावाचा अर्थ

'पन्हाळा' या नावाचा मराठीत शब्दशः अर्थ 'सर्पांचे घर' किंवा 'नागांचे निवासस्थान' असा होतो. 'पन्हाळा' या शब्दाचा उल्लेख 'करवीर पुराण' सारख्या प्राचीन स्थानिक ग्रंथांमध्ये 'पन्नगालय' असा केला गेला आहे, ज्याचा थेट अर्थ 'सर्पांचे घर' असा होतो.

The Meaning of the Name 'Panhala' | google

किल्ल्याचा भौगोलिक आकार

पन्हाळा किल्ल्याची भौगोलिक रचना वळणावळणाची आणि नागमोडी असल्याने तसेच त्याची तटबंदी एखाद्या सरपटणाऱ्या सापासारखी भासत असल्यानेही याला पन्हाळागड हे नाव पडले असावे.

The Fort's Geographical Shape | google

पन्हाळा किल्ल्याची उभारणी

पन्हाळा किल्ल्याची उभारणी इ.स. ११७८ मध्ये शिलाहार राजवंशातील राजा भोज (दुसरा) याने केली होती. पन्हाळा किल्ल्याला हिंदू ऋषी पराशर यांचे ऐतिहासिक निवासस्थान आणि तपश्चर्येचे ठिकाण मानले जाते.

Construction of Panhala Fort | google

कसं जाल?

पन्हाळा किल्ला हा कोल्हापूरपासून साधारणपणे २० ते २२ किमी अंतरावर आहे. कोल्हापूरला पोहचल्यावर तुम्ही टॅक्सी, स्वतःचे वाहन किंवा एसटी बसने सहज जाऊ शकता. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

train | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : वीकेंडला थेट डोंबिवली ट्रेन पकडा, काही तासांत पोहचाल 'या' थंडगार हिल स्टेशनला

Dombivli Tourism | saam tv
येथे क्लिक करा...