Shreya Maskar
डोंबिवलीजवळ अनेक थंडगार हिल स्टेशन आहेत. येणारा वीकेंड तुम्ही येथे नक्कीच प्लान करू शकता. तसेच निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला भन्नाट फोटोशूट करता येईल. डोंबिवली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने या थंड ठिकाणी जाऊ शकता.
माळशेज घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात खुलून येते. हा एक अतिशय नयनरम्य पर्वतीय घाट आहे. उन्हाळ्यातही येथे थंड वातावरण अनुभवता येते. रस्ते दाट धुक्याने आच्छादलेले असतात आणि अनेक हंगामी धबधबे थेट रस्त्यावरच कोसळत असतात.
जव्हार हिल स्टेशनला 'ठाणे/पालघर विभागाचे महाबळेश्वर' म्हटले जाते. तुम्ही येथे कपल, मित्रमंडळी किंवा फॅमिलीसोबतही जाऊ शकता. येथे गेल्यावर आदिवासी संस्कृती आणि वारली कला जवळून पाहता येईल.
आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान होय. तुम्ही येथे चालत, घोड्यावर स्वार होऊन किंवा ऐतिहासिक 'टॉय ट्रेन'ने सफर करू शकता. हा अनुभव लहान मुलांना खूप आवडेल.
मे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला तुम्हाला जवळच कुठे तरी फिरून यायचे असेल तर लोणावळा- खंडाळा हिल स्टेशन बेस्ट ऑप्शन आहे. येथील हिरव्यागार टेकड्या, भुशी डॅम आणि कुणे धबधबे विशेष प्रसिद्ध आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले इगतपुरी एक अतिशय सुंदर पर्वतीय पर्यटन स्थळ आहे. येथील प्राचीन किल्ले, धबधबे पाहायला नक्की जा. तुम्ही येथे मस्त रोड ट्रिप देखील प्लान करू शकता.
कर्जत हे उल्हास नदीच्या काठावर वसलेले ठिकाण आहे. पेठ किल्ल्यावर ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. येथे आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळे आहेत. उदा. चंदेरी लेणी, कोंडाणा लेणी
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.