konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Shreya Maskar

कोकण-सिंधुदुर्ग

कोकण सिंधुदुर्ग येथे रेडी किल्ला वसलेला आहे. रेडी किल्ल्याला 'यशवंतगड' म्हणूनही ओळखे जाते. हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात गोवा सीमेच्या अगदी उत्तरेला वसलेला शेकडो वर्षे जुना सागरी किल्ला आहे.

Konkan – Sindhudurg | google

रेडी किल्ला

१६ व्या शतकात बांधलेला आणि दाट वनराईने वेढलेला रेडी किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा एक विलक्षण संगम सादर करतो. तुम्ही येथे उन्हाळी सुट्टी संपण्याआधी नक्की फिरायला जा.

Redi Fort | google

स्वयंभू मूर्ती

रेडी किल्ल्याच्या परिसराशी जोडलेले सर्वात मोठे रहस्य म्हणजे येथील 'गडगणपती'. खाणीत खोदकाम करत असताना दोन हातांची (द्विभुज) अत्यंत दुर्मिळ व भव्य स्वयंभू गणेशाची मूर्ती सापडली.

Swayambhu mandir | google

अज्ञात भुयारी मार्ग

रेडी किल्ल्यामध्ये नैसर्गिक रचना, भक्कम तटबंदी आणि २० फूट खोल खंदक आहे. स्थानिक आख्यायिकांनुसार, समुद्राच्या धोक्यापासून वाचण्यासाठी आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी किल्ल्यातून अनेक गुप्त भुयारी मार्ग होते, ज्यांचे दरवाजे आता काळाच्या ओघात बंद झाले आहेत.

Unknown Underground Tunnels | google

रेडी किल्ला कोणी बांधला?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील 'रेडी किल्ला'हा १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधला. ट्रेकिंगसाठी देखील हे ठिकाण लोकप्रिय आहे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे फोटोज् क्लिक करू शकता.

Who Built Redi Fort? | google

इतिहास

१६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेल्या रेडी किल्ल्याची मालकी मराठे, पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्यात वारंवार बदलत राहिली. रेडी किल्ल्याच्या परिसरातच 'रेडी बीच' आणि 'पॅराडाईज बीच' आहे.

History | google

सागरी तटबंदी

रेडी किल्ल्याला शेकडो वर्षे जुनी सागरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची तब्बल २५ फूट इतकी भक्कम आहे. रेडी किल्ला एका १५० फूट उंच टेकडीवर वसलेला असून तिथून रेडी समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ला पूर्णपणे मजबूत जांभ्या दगडात बांधलेला आहे.

Sea Fortifications | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रायगडच्या किनाऱ्यावरील भक्कम सागरी किल्ला, 'येथील' ऐतिहासिक वैभव पाहताच डोळे दिपतील

Raigad | google
येथे क्लिक करा...