Shreya Maskar
रेवदंडा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील प्राचीन पोर्तुगीजकालीन सागरी किल्ला आहे. हा किल्ला अलिबागच्या दक्षिणेस सुमारे १७ किमी अंतरावर आणि कोरलाई किल्ल्याच्या ४ किमी आधी वसलेला आहे.
रेवदंडा किल्ला काळ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी आणि ऐतिहासिक अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे सुट्ट्यांमध्ये मित्र-परिवारासोबत पिकनिक प्लान करू शकता.
रेवदंडा किल्ला त्याच्या १६ व्या शतकातील पोर्तुगीज वसाहतकालीन वारशासाठी, कुंडलिका नदी आणि अरबी समुद्र यांचा संगमासाठी आणि रेवदंडा बीच यांसाठी प्रसिद्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रेवदंडा किल्ल्याने आपल्या प्रदीर्घ इतिहासात प्रामुख्याने पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश या तीन प्रमुख सत्तांचा कार्यकाळ पाहिला आहे.
रेवदंडा किल्ल्याची बाहेरील तटबंदी आजही अतिशय भक्कम स्थितीत असून, या तटबंदीवरून संपूर्ण परिसराचा विहंगम नजराणा पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आतमध्ये जुन्या पोर्तुगीज चर्चचे भग्नावशेष, बेल टॉवर आणि वेगवेगळ्या मिशनचे अवशेष आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरील शत्रूंना रोखण्यासाठी व स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मराठा नौदलाची स्थापना केली, ज्यामध्ये रेवदंडा आणि परिसरातील किनारपट्टीचे महत्त्व अनन्यसाधारण होते.
रेवदंडा समुद्रकिनारा गडद रंगाच्या ज्वालामुखीजन्य वाळूसाठी, शांत - गर्दीविरहित वातावरणासाठी, सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी, कॅम्पिंगसाठी, फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.